
साऊथ सुपरस्टार आणि तमिळगा वेट्री कझगम (TVK) पक्षाचा सर्वेसर्वा विजय थलपतीच्या रोड शो दरम्यान अपघाताची घटना घडली. टीव्हीकेच्या रोड शो दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. या घटनेमुळे राजकीय रॅलींमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी तमिळगा वेट्री कझगम (TVK) पक्षातर्फे रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अनेक दुचाकीस्वार विना हेल्मेट दुचाकी चालवत आणि सेल्फी घेत होते. यादरम्या एका दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. यात तो जखमी झाला आहे.
या घटनेमुळे राजकीय कार्यक्रमांदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, विजय थलपती यांचा पक्ष ‘तमिळगा वेट्री कझगम’ने या निवडणुकीत पहिल्यांदाच सहभाग घेतला आहे.


























































