गणपती विसर्जनसाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

145

सामना प्रतिनिधी। मेहकर

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे गणपती विसर्जनसाठी गेलेल्या दोघा तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पुरूषोत्तम सोळंके (17) आणि महादेव ताकतोडे (22) अशी मृत तरुणांची नावं आहेत. तर अवि जगताप व संतोष धाडकर या दोघांना वाचवण्यात यश आले आहे.

शेलगाव येथील बाल गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रविविरी दुपारी गणपती विसर्जनासाठी कणका पाझर तलावावर गेले होते. त्यावेळी पुरूषोत्तम आणि महादेव यांच्यासह अवि जगताप व संतोष धाडकर हे चारजण पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाले. यात दोघांचा बूडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, वाचवण्यात आलेल्या अवि जगताप आणि संतोष धाडकर या दोघांवर मेहकर येथील मल्टी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डोणगावचे पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे शेलगाव देशमुख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या