म्हशीला वाचवण्याच्या नादात भीषण अपघात, गाड्या एकमेकांना आदळून 4 जणांचा मृत्यू

उदयपूर-अहमदाबाद महामार्गावरील ऋषभदेवजवळ शनिवारी रात्री भीषण अपघात घडला आहे. म्हशीला वाचवण्याच्या नादात टॅंकर, ट्रक, जीप आणि एक बोलेरो एकमेकांवर धडकून हा अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

हा अपघात शनिवारी रात्री उदयपूर-अहमदाबाद महामार्गावरील ऋषभदेवजवळ घडला. उदयपूरहून परतणारी बोलेरो म्हशीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये उलटली. बोलेरोमधील चारही प्रवासी बाहेर पडून दुभाजकावर उभे राहण्यात यशस्वी झाले, मात्र समोरून एक भरधाव ट्रेलर आला जो दुभाजकाला धडकला आणि त्या चौघांनाही चिरडले. धडक इतकी भीषण होती की मृतदेह ओळखता येत नव्हते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली आहेत. जखमींना ऋषभदेव रुग्णालयात नेण्यात आले.