भाजप आमदाराच्या पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

6258

भाजपच्या आमदार स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांचे निधन झाले आहे. ते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते. आंघोळ करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. वाघ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

उदय वाघ हे जळगाव जिल्ह्यातील भाजपचं मोठं नाव मानलं जायचं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उदय वाघ यांचे नाव चर्चेत आले होते. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे उदय वाघ नाराज झाले होते. त्यावेळी गिरीश महाजन यांच्यासमोर जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरमध्ये भाजपच्या सभेत तुफान राडा झाला होता. भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यात आणि माजी आमदार बीएस पाटील यांच्यामध्ये हा वाद झाला होता. या गोंधळात गिरीश महाजनांनाही धक्काबुक्की झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या