पुण्यात उद्धव ठाकरे यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

ढोल-ताशांचा गजर… जेसीबीमधून फुलांची उधळण… ‘आवाज कोणाचा… शिवसेनेचा’, ‘उद्धवसाहेब आप आगे बढो… हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणाबाजीने दणाणून गेलेला परिसर… फटाक्यांची आतषबाजी… अन् शिवसैनिकांचा एकच जल्लोष… अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने  शुक्रवारी औद्योगिकनगरीत स्वागत करण्यात आले. शिवसेनेचा शनिवारी पुण्यात ‘शिवसंकल्प मेळावा’ होणार आहे. या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)