
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार वरुण सरदेसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व फोटो- रुपेश जाधव