
श्री शिवाजी मंदिर, दादर येथे आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांच्या वतीने वृक्षारोपण व संवर्धन 8 व्या ‘प्रेरणा मास’ बक्षिस वितरण आणि शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन सोहळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. आमदार अभ्यंकर यांच्या शिक्षण क्षेत्र आणि विधीमंडळातील कार्याचा गौरव करत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, विभागप्रमुख आमदार महेश सावंत तसेच इतर शिक्षक सेना आणि शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.