हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेन दौऱ्यावर जाण्याआधीच युक्रेनने रशियाच्या मॉस्को शहरावर आतापर्यंत सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियाच्या वायू दलाकडून उड्डाण होणाऱ्या कमीत कमी 10 ड्रोनला नष्ट करण्यात आले आहे.
पुतीनला युद्धाचा होतोय पश्चाताप
अडीच वर्षांत युक्रेनने 8,522 रशियन रणगाडे, 16,542 चिलखती वाहने, 17,216 तोफखाने, 1,166 रॉकेट यंत्रणा, 928 हवाई संरक्षण यंत्रणा, 367 विमाने, 328 हेलिकॉप्टर्स, 28 जहाज आणि 1 पाणबुडी नष्ट केली आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या दाव्यानुसार युव्रेनियन सैन्याने 1250 चौरस किमी रशियन प्रदेश ताब्यात घेतला आहे. व्रेनच्या लष्कराने पुर्स्पमध्ये बांधलेला तिसरा पूलही पाडला आहे. युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेशचूक यांनी दुजोरा दिला. हे सर्व पूल पुर्स्पच्या ग्लुशकोव्स्की जिह्यातील सेम नदीवर बांधले गेले.
रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षांचा काळ लोटला असून या दोन वर्षांत 6 लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून रशियन आक्रमणाचा सामना करणाऱ्या युक्रेनियन लष्कराने आता पलटवार सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी 1,210 रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनने केला. तर युक्रेनचे 2,000हून अधिक सैनिक मारले आहेत, असा दावा रशियन लष्कराने सोशल मीडियावर केला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील संवादाचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुतीन यांच्या आधी मेदवेदेव हे रशियाचे अध्यक्ष होते. जोपर्यंत युक्रेनचा पूर्ण पराभव होत नाही तोपर्यंत चर्चेला काहीच अर्थ नाही, असे रशियन सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख मेदवेदेव म्हटले आहे.