
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीला पहिल्या तिमाहीत 2226 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. तर कंपनीचा रिवेन्यू चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित 13 टक्के वाढून 21,275 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सिमेंट कंपनीचा रेवेन्यू 18,818 कोटी रुपये होता. मार्च 2025 च्या तिमाहित कंपनीचा रेवेन्यू 23,063 कोटी रुपये होता. तर अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर गेल्या पाच वर्षात 233 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.