
इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी युद्धाचा भडका उडाला आणि हळूहळू आखातातील जवळपास सर्वच देश या युद्धाच्या कचाट्यात सापडले. या संघर्षाची वाटचाल आता महायुद्धाच्या दिशेने सुरू असून संयुक्त राष्ट्राने यावर चिंता व्यक्त करत हे युद्ध तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे.
मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जग सध्या एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे, असा इशारा देत त्यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराणला तत्काळ युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. ते गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
विनाशापेक्षा संवादाची निवड करण्याची हीच वेळ आहे. संघर्ष आपोआप संपत नाहीत, तर जेव्हा नेते शांततेचा मार्ग निवडतात तेव्हाच ते थांबतात. हा पर्याय अजूनही उपलब्ध आहे आणि तो आताच स्वीकारला पाहिजे, असे म्हणत गुटेरेस यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे कान टोचले. मानवाला दु:ख देणारे आणि मोठी आर्थिक हानी पोहोचवणारे हे युद्ध आता थांबवण्याची वेळ आली आहे, असेही गुटेरेस म्हणाले. यावेळी त्यांनी इराणलाही शेजारील देशांवरील हल्ले तत्काळ थांबवण्याचे आवाहन केले.
STORY | UN Chief Guterres calls for dialogue to end West Asia conflict
UN Secretary General Antonio Guterres on Thursday delivered a “clear” message to the US, Israel and Iran to stop the war in West Asia, warning that the world is on the “edge of a wider war”.
READ:… https://t.co/KmEmpZz7B9
— Press Trust of India (@PTI_News) April 2, 2026
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवरही भीषण परिणाम होत आहेत. ओमान आणि इराण दरम्यान असलेली होर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे जगावर ऊर्जा संकट घोंघावत आहे. फेब्रुवारीमध्ये या मार्गावरून दिवसाला सरासरी 130 जहाजांची ये-जा व्हायची. युद्ध सुरू झाल्यानंतर मार्चमध्ये दिवसाला केवळ 6 जहाजं येथून ये-जा करत आहेत. या भागातून होणारा व्यापार जवळपास 95 टक्क्यांनी घटला आहे. यामुळे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन जगभरात इंधन आणि अन्नाचे दर वाढत आहेत. याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसत आहे.
दरम्यान, मध्य पूर्वेतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुटेरेस यांनी त्यांचे वैयक्तिक दूत अनुभवी फ्रेंच मुत्सद्दी जीन अर्नाल्ट यांना पश्चिम आशियात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्नाल्ट हे या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि सर्व पक्षांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करतील.
UN Secretary-General António Guterres (@antonioguterres) posts, “My message is clear: To the USA & Israel: It is high time to stop the war that is inflicting immense human suffering & triggering devastating economic consequences. To Iran: Stop attacking your neighbours. Conflicts… pic.twitter.com/9yjTU8UUVt
— Press Trust of India (@PTI_News) April 2, 2026



























































