
काँक्रीटीकरणासाठी रुंद केलेल्या रस्त्यावरच भूमाफियाने बेकायदा इमला बांधल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही कारवाई होत नसल्याने पालिका प्रशासन मात्र धृतराष्ट्र बनल्याचे बोलले जात आहे. भिवंडीतील झेंडा नाक्यावर अनधिकृत बांधकामाचा झेंडा रोवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बांगड गल्ली झेंडा नाका परिसरात काँक्रीटीकरणासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात आले. यामध्ये किशोर जव्हेरी, सुनिता जव्हेरी व राहुल जव्हेरी यांचे घर नं. १ बाधित झाले. त्यामध्ये अवघी सवा फूट जागा शिल्लक असताना शेजारील काही मालमत्ताधारकांनी बांधकाम न तोडता बाधित बांधकामाचा वापर करून अधिक जागेत बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. तर रस्ता रुंदीकरण करताना पालिकेने काही ठिकाणी मोजमाप घेताना कमी जास्त केल्याचा आरोप बाधितांनी केला आहे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. मात्र याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
आदेशाला केराची टोपली
पालिका प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे अतिक्रमण झाल्याचे लक्षात आले. पालिकेने भूमाफियांना सात दिवसांत अतिक्रमण केलेले बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याची माहिती स्थानिक प्रभाग समिती क्रमांक पाचचे प्रभारी सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव यांनी दिली. मात्र या आदेशाला एक महिना उलटून गेला. तरी भूमाफियांनी पालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
कामवारी नदी पात्रातील हे अतिक्रमण त्वरित काढून टाकून अतिक्रमण नदीलगत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मोनिश गायकवाड यांनी केली आहे. नादुरुस्त वापरता नसलेले शौचालय आहे. तेथे जर कोणते बांधकाम सुरू असेल तर त्याची तत्काळ माहिती घेऊन अतिक्रमण हटवण्यात येईल व संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती शेलार ग्रामपंचायतीचे प्रशासक सुधाकर सोनवणे यांनी दिली आहे.