ठाणे, पुणे येथील मेट्रो मार्गांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेल्या महाराष्ट्रातील पुणे आणि ठाणे येथील मेट्रो प्रकल्पांच्या पुढच्या टप्प्यांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉर 29 कि.मी. लांबीचा असून ठाण्याच्या पश्चिम बाजूने 22 स्थानकांसह याची उभारणी होणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्प एकूण 2 हजार 954 कोटी रुपयांचा असून तो फेब्रुवारी 2029पर्यंत पूर्ण होईल. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातीलच हा विस्तारित मार्ग असणार आहे. हा भुयारी मार्ग असेल आणि लांबी 5.46 किलोमीटर असेल.