
1 फेब्रुवारी 2026 हा दिवस हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकांसाठी खास असणार आहे. कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आर्थिक वर्ष 2026-27 चे बजेट सादर करणार आहेत, तर दुसरीकडे या महिन्यातील 1 तारीख असल्याने रोजच्या आयुष्याच्या संबंधित अनेक महत्त्वपूर्ण नियमांत बदल पाहायला मिळणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीपासून फास्टॅगच्या नियमात होणाऱ्या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे.
1 फेब्रुवारीला बँकिंगपासून टॅक्स आणि व्हिरेफिकेशन सिस्टमपर्यंत अनेक बदल पाहायला मिळतील. दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या इंधनच्या किमतीची समीक्षा करतात. 1 फेब्रुवारीला 14.2 किलो घरगुती आणि 19 किलो कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या नव्या किमती जारी केल्या जातील. यासोबतच सीएनजी-पीएनजी आणि विमान इंधन (एटीएफ) च्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. जर विमान इंधन महाग झाल्यास विमान तिकीट महाग होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांसाठी एक मोठी बातमी आहे. 1 फेब्रुवारीपासून वारंवार केवायसी करण्याची गरज संपणार आहे. एकदा ऑक्टिवेट झाल्यानंतर युजर्सला रेगुलर व्हेरिफिकेशनचा त्रास पुन्हा सहन करावा लागणार नाही. मालमत्तेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने नियमात बदल करण्याचे ठरवले आहे. 1 फेब्रुवारीपासून जमीन किंवा घराची नोंदणी करताना आधार ऑथेंटिफिकेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता यापुढे केवळ खरेदीदार आणि विक्री करणारा व्यक्ती नव्हे तर साक्षीदाराचेही आधार व्हेरिफिकेशन केले जाणार आहे.
तंबाखू–पान मसाला महागणार
1 फेब्रुवारी 2026 पासून तंबाखू उत्पादन आणि पान मसाला महाग होणार आहे. तंबाखूच्या उत्पादनावर अतिरिक्त ऍक्साइज डय़ुटी लागू होणार आहे. पान मसालावर हेल्थ आणि नॅशनल सिक्योरिटी सेस लावला जाईल. हा नियम संपूर्ण देशभर 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. या नव्या नियमामुळे आगामी काळात तंबाखू आणि पान मसाला याच्या किमती वाढणार आहेत.
शेअर मार्केट सुरू राहणार
1 फेब्रुवारीला रविवार आला आहे. रविवारी शेअर मार्केटला सुट्टी असते, परंतु या रविवारी मात्र शेअर मार्केट खुले राहणार आहे. रविवारी बजेट सादर केले जाणार असल्याने एनएसई आणि बीएसई दोन्ही खुले राहतील. शेअर बाजार सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुरू होऊन दुपारी 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत ट्रेडिंग करेल. बजेट सकाळी 11 वाजता सादर केले जाणार आहे. या दरम्यान बाजारात चढ-उतार पाहायला मिळू शकतो.
























































