
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळी नागरिक शांभवी अधिकारी यांना बर्लिनला जाण्यापासून रोखण्यात आल्याचे प्रकरण चर्चेत आहे. हिंदुस्थानचे इमिग्रेशन अधिकारी नेपाळी नागरिकाऱ्यांसोबत भेदभाव करत असल्याचा दावा नेपाळचा मीडिया करत आहे. याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले की, ‘शांभवी अधिकारी यांचा पुढचा प्रवास रोखण्याचा निर्णय गृह मंत्रालयाचा नव्हता, एअरलाइन कंपनीने व्हिसा वैधता व गंतव्य देशाच्या (जर्मनी) नियमांच्या आधारावर त्यांचा प्रवास रोखला होता.
            
		





































    
    
























