केंद्रीय मंत्री जुआल ओराम यांच्या पत्नीचे डेंग्युमुळे निधन झाले आहे. त्या 58 वर्षांच्या होत्या ओडिशामध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
केंद्रीय आदिवासी मंत्री जुआल ओराम यांच्या पत्नी झिंगिया ओराम यांना डेंग्युची लागण झाली होती. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांची तब्येत सुधारली नाही. अखेर 58 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दुसरीकडे जुआल ओरम यांनाही डेंग्युची लागण झाली होती आणि त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. झिंगिया ओराम यांच्या मृत्यवर मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी शोक व्यक्त केला आहे.