बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भूमी पेडणेकर. तिच्या कारकिर्दीत कमी सिनेमे केले मात्र जे केले ते खूप गाजले. त्या सिनेमांद्वारे भूमी इंडस्ट्रीत आपलं नाव कमवण्यात यशस्वीही झाली.नुकतेच भूमीने इंस्टाग्रामवर अनोख्या स्टाईलमध्ये साडी नेसलेले फोटो शेअर केले आहेत. भूमीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने कॅप्शन दिले आहे,सारी में सबसे प्यारी Wearing भूमीने शिमोना अग्रवाल ब्रँडच्या लेबलच्या कलेक्शनमधील निळ्या रंगाची साडी नेसली होती जी खूपच सुंदर दिसत होती.भूमीची 6 यार्डची साडी क्रेप फॅब्रिकची होती. त्यावर जुळणारा ऑफ-शोल्डर ब्लाउज घातला होता.या लूकसाठी भूमीचे स्टाइलिंग सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट मनीषा मेलवानी यांनी केले आहे. भूमीने आउटफिटसोबत मोजकी ॲक्सेसरीज कॅरी केली. तर मेकअप आर्टिस्ट सोनिकने भूमीचा मेकअप केला होता.