‘अवकाळी’चा द्राक्षांना फटका; भाव 30 टक्क्यांनी घसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून, द्राक्ष उत्पादक शेतकऱयांचे पंबरडे मोडले आहे. तोडणीच्या उंबरठय़ावर असलेल्या द्राक्षबागांना पावसाचा तडाखा बसल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात द्राक्षांच्या दरात तब्बल 30 टक्क्यांनी घसरण झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्पेटयार्डातील फळबाजारात दररोज 30 ते 40 टन आवक होत असते. यंदा हंगाम आधीच उशिरा सुरू झाला होता. साधारणतŠ डिसेंबरपासून सुरू होणारा हंगाम पावसामुळे महिनाभर पुढे ढकलला गेला. छाटणी उशिरा झाल्याने फळधारणा उशिरा झाली आणि आता तयार झालेल्या पिकावरच पावसाचा घाला बसला. सध्याची परिस्थिती पाहाता हंगाम मे-अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.