
यूआयडीएआयचे ई–आधार मोबाईल अॅप येतेय
यूआयडीएआय लवकरच एक नवीन मोबाईल अॅप ई-आधार लाँच करण्याची तयारी करत आहे. हे अॅप सध्या डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहे. हे कधी लाँच केले जाईल यासंबंधी अद्याप यूआयडीएआयकडून तारखेची घोषणा करण्यात आली नाही, परंतु हे अॅप लाँचिंग झाल्यानंतर आधारसंबंधी अनेक कामे घरी बसून मोबाईलवर करता येतील. हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध केले जाईल. या नव्या अपडेटनंतर आधारकार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबरला स्मार्टपह्नद्वारे अपडेट करता येऊ शकेल. यासाठी आता आधार सेंटरला जाण्याची गरज राहणार नाही.
यूपीआयची विनंती सेवा 1 ऑक्टोबरपासून बंद
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1 ऑक्टोबर 2025 पासून यूपीआयमध्ये पीअर-टू-पीअर रिक्वेस्ट गोळा करणे पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याचाच अर्थ म्हणजे आता एखादी व्यक्ती यूपीआयद्वारे दुसऱ्या व्यक्तीला पैसे मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. पीटूपी सर्व्हिसद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैशांसाठी विनंती पाठवू शकत होता, परंतु 1 ऑक्टोबरपासून ही सुविधा बंद केली जाणार आहे. फसवणुकीची प्रकरणे समोर आल्यानंतर एनपीसीआयने हा निर्णय घेतला आहे. जुलै 2025 मध्ये यूपीआयवरून 19.4 अब्ज व्यवहार करण्यात आले आहेत.
तीन हजारांत वर्षभरासाठी फास्टॅग पास सेवा सुरू
आजपासून राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्यात आला आहे. या पासची किंमत तीन हजार रुपये असून ती एक वर्षासाठी वैध असणार आहे. या पासद्वारे वाहनधारकांना किमान 200 वेळा टोल पार करण्याची मुभा मिळणार आहे. या फास्टॅग पास सेवेमुळे टोल प्लाझावर गर्दी कमी होईल, असा दावा सरकारकडून केला जात आहे. वार्षिक पासमुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. टोल कर्मचारी आणि चालकांमधील वाद कमी होण्याची शक्यता आहे. वार्षिक पास घेतला पाहिजे असे बंधनकारक नाही.
आयसीआयसीआय बँकेचा खातेदारांना दिलासा
आयसीआयसीआय बँकेने खातेदारांना दिलासा दिला आहे. बचत खात्यात ठेवली जाणारी किमान शिल्लक रक्कम आता 50 हजार ठेवण्याची गरज नाही. नवीन आदेशानुसार, आयसीआयसीआय बँकेने शहरी खातेदारांसाठी किमान 15 हजार, अर्ध-शहरी (लहान शहरे) मध्ये 7,500 आणि ग्रामीण भागात 2,500 पूर्वीप्रमाणेच राहील. जर शिल्लक रक्कम यापेक्षा कमी असेल तर ग्राहकांना दंड भरावा लागू शकतो. 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडलेल्या नवीन खात्यांना हा नवीन नियम लागू होईल. आयसीआयसीआयने चार दिवसांपूर्वी एक आदेश जारी केला होता की, बँकेच्या खातेधारकांना खात्यात किमान 50 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील, असे म्हटले होते.
बीएसएनएलची दिल्लीत 4 जी सेवा सुरू
सरकारी टेलिका@म कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने शुक्रवारी दिल्लीत 4 जी मोबाईल नेटवर्प लाँच केले. ही सेवा 4 जी एज ए सर्व्हिस मॉडलअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या नव्या सर्व्हिसमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना हाय स्पीड डेटा आणि क्लिअर व्हाईस का@लिंग सुविधा मिळेल. बीएसएनएलने गेल्या वर्षी 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात 4 जी नेटवर्प रोलआऊट सुरू केले होते. याअंतर्गत 1 लाख मोबाईल टॉवर बसवले होते. या प्रोजेक्टसाठी टीसीएस आणि सी-डॉटची मदत घेतली होती. बीएसएनएल कंपनी आता आणखी 47 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.