युपीएससीचा अभ्यासक्रम आता एफवायपासून; परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार बळ, मुंबई विद्यापीठ, चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा करार

युपीएससीसह विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्नशील असतात. पण त्यांना योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळतेच असे नाही. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता विद्यार्थ्यांना बळ मिळणार आहे. युपीएससीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एफवायपासूनच शिकणे शक्य होणार आहे. विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाबरोबरच युपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करू शकतील. याबाबत मुंबई विद्यापीठ व ठाणे महापालिकेचे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये आज ऐतिहासिक करार करण्यात आला.

आयपीएस, आयएएससारख्या स्पर्धा परीक्षा देण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पहात असतात. पण महाराष्ट्रात ठाणे पालिकेने १९८७ पासून चिंतामणराव देशमुख उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. ते वाढावे यासाठी प्रशासकीय प्रशिक्षण संस्था स्थापन केली. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतले आहे. आज या संस्थेने एक पाऊल पुढे टाकत मुंबई विद्यापीठाबरोबर महत्त्वाचा करार केला. या करारावर आयुक्त सौरभराव आणि कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी पालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे, महादेव जगताप, डॉ. प्रसाद कानडे, प्र. कुलगुरु डॉ. अजय भामरे आदी उपस्थित होते.

  • युपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम एफवाय, एसवाय आणि टीवायमध्येच विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. पदवी घेतानाच या परीक्षांच्या अभ्यासाची तयारी होईल.
  • विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आठ क्रेडीट मिळणार असून त्यानंतर १२ क्रेडीट दिली जाणार आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
  • पदवीची तयारी करीत असतानाच स्पर्धा परीक्षांच्या तयारीचेही प्रशिक्षण मिळणार असल्याने आत्मविश्वासाने विद्यार्थी या परीक्षांना सामोरे जातील असे कुलगुरु कुल कर्णी यांनी सांगितले.

नेमके काय शिकवणार?

स्पर्धा परीक्षेचे एकूण स्तर, परीक्षेचा अभ्यासक्रमाची कार्यपद्धती, परीक्षेत यश मिळवण्याकरिता व्यक्तिमत्त्व कौशल्यांचा विकास, प्रभावी लेखन आणि संभाषण कौशल्य विकसित करणे आदींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होणार आहे.