Urvashi Rautela पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल; व्हिडीओ शेअर केल्याने रंगल्या वेगवेगळ्या चर्चा

ग्लॅमरस अभिनेत्री उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वी तिच्या अश्लील व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. आता उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी ती सोशल मीडियावर तिच्या कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओमुळे नाही तर तिच्या तब्येतीमुळे. उर्वशीने नुकताच हॉस्पिटलमधील तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ती रुग्णालयात दाखल झाली आहे. उर्वशीने बाथरोब परिधान केला असून तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून मासिक वाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उर्वशीने ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’ असे कॅप्शनही दिले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

उर्वशीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. त्यांनी या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, हा सुद्धा उर्वशीचा पब्लिसिटी स्टंट आहे, काळजी नसावी. तर एकाने उर्वशी फक्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी असं करते, असे म्हटले आहे.

दरम्यान, याआधी गेल्याच महिन्यात फ्रॅक्चर झाल्यामुळे उर्वशी रौतेलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हैदराबादमध्ये नंदामुरी बालकृष्णा यांच्या आगामी तेलुगू सिनेमा ‘NBK 109’ साठी शूटिंग करत असताना एका ॲक्शन सीनदरम्यान ती जखमी झाली होती.