आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करू; अमेरिकेची हिंदुस्थान, चीन आणि ब्राझीलला धमकी

अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी रशियन तेल आयात करणाऱ्या देशांना कडक इशारा दिला आहे. हिंदुस्थान, चीन आणि ब्राझील या देशांनी त्यांनी ट्रम्पच्या व्यापार कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा दिला आहे. ट्रम्प हिंदुसथान, चीन आणि ब्राझीलसारख्या रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लादणार आहेत. आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करू अशी धमकीही त्यांनी दिली आहे.

रशियाच्या कच्च्या तेलाच्या खरेदीत हिंदुस्थान, चीन आणि ब्राझील या 3 देशांचा वाटा सुमारे 80 टक्के आहे. ग्राहमचा असा युक्तिवाद आहे की त्यांचा सततचा व्यापार व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनविरोधातील युद्धाला चालना देतो आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना कमकुवत करतो. जर हिंदुस्थान, चीन आणि ब्राझील यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहिले तर आम्ही त्यांना उद्ध्वस्त करू, अशी धमकीही त्यांनी दिली.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, आपण चीन, हिंदुस्थान आणि ब्राझीलला इशारा देत आहेत की, हे युद्ध सुरू ठेवण्यासाठी स्वस्त रशियन तेल खरेदी करत राहिलात तर आम्ही तुम्हाला नष्ट करू आणि तुमची अर्थव्यवस्था नष्ट करू. ट्रम्प प्रशासन निर्णायक कारवाई करण्यास तयार आहे आणि पुतिन यांना 14 जुलैपर्यंत लष्करी कारवाई थांबवण्यासाठी 50 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे, अन्यथा त्यांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागेल. ज्यामध्ये तेल खरेदी करून रशियाच्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणाऱ्या देशांवर दंड आकारण्याचाही समावेश आहे. ग्राहम म्हणाले की पुतिन, तुमची वेळ येत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन राजकारण आणि परराष्ट्र धोरणाचे स्कॉटी शॅफलर आहेत आणि ते तुम्हाला पराभूत करतील, असेही ते म्हणाले.