अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने महिला डॉक्टरने जीवन संपवले

हैदराबादमध्ये एका 38 वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या करून जीवन संपवले आहे. अमेरिकन व्हिसाचा अर्ज नाकारल्याने हे पाऊल उचलल्याचे  महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. व्ही. रोहिणी असे मृत डॉक्टरचे नाव आहे. त्यांना  अमेरिकेत एक क्लिनिक सुरू करायचे होते, असे त्यांच्या आई व्ही. लक्ष्मी राजू यांनी सांगितले. यासाठी डॉक्टर व्ही. रोहिणी यांनी अमेरिकेच्या एका महाविद्यालयात अर्ज केला होता आणि तो स्वीकारण्यात आला होता.

तीन महिन्यांपूर्वी व्हिसासाठीचा त्यांचा अर्ज नाकारण्यात आल्यानंतर त्यांना प्रवेश रद्द करावा लागला होता.  गुरुवारी रात्री हैदराबादमधील पद्माराव नगर येथील फ्लॅटमध्ये डॉक्टर रोहिणी यांनी आत्महत्या केली. चिल्कलगुडा पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्या रात्री त्यांना भेटायला आले होते. कुटुंबीय तेथून गेल्यानंतर डॉक्टर रोहिणी यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.