अमेरिकेच्या व्हिसा धोरणाचा चीन, हिंदुस्थानला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या नव्या व्हिसा धोरणाचा सर्वात जास्त फटका चीन आणि हिंदुस्थानला बसल्याचे उघड झाले आहे. 2025 च्या पहिल्या आठ महिन्यांत या दोन्ही देशांना 2024 च्या तुलनेत 25 लाख कमी व्हिसा जारी करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडून मार्चच्या सुरुवाताली जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

चीन आणि हिंदुस्थानी नागरिकांसाठी जारी करण्यात येत असलेल्या व्हिसाची संख्या जवळपास 84 हजार कमी झाली आहे. ही संख्या खास करून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि कामगार यांची आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2024 या दरम्यान अमेरिकेने 3.44 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केले होते. तर 2025 मध्ये याच काळात ही संख्या कमी होऊन 2.38 लाखांपर्यंत खाली आली. समुद्री आणि हवाई सेवा कर्मचाऱ्यांना जारी करण्यात आलेल्या व्हिसाच्या संख्येतही 30,876 ने कपात करण्यात आली आहे. सांस्कृतिक कामासाठी देण्यात येणाऱ्या व्हिसातही कपात झाली आहे. याआधी 37,229 व्हिसा देण्यात आले होते. परंतु आता केवळ 18,892 व्हिसा देण्यात आले आहेत.