आग्य्रात एटीएसने पाकिस्तानी गुप्तहेराला पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश एटीएसने आग्रा येथे एका पाकिस्तानी गुप्तहेराला पकडले आहे. आदर्श कुमार ऊर्फ लकी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो हिंदुस्थानी नौदलात लान्स नायक म्हणून कार्यरत आहे. लकी हा पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. आरोपीने आयएसआय एजंटला देशातील युद्धनौकांचे फोटो आणि तपशील पाठवले आहेत. आरोपीचे 22 दिवसांपूर्वीच लग्न झाले असून तो तीन दिवसांपूर्वीच हनीमूनवरून परतला होता. लकीची नियुक्ती दक्षिण नौदल कमांड, कोची येथे होती. लकी आयएसआयला भारताशी संबंधित महत्त्वाची माहिती पाठवत असल्याची माहिती एटीएसला कळली होती.