उत्तर प्रदेशातील सोनभद्र या जिल्ह्याच्या ठिकाणी भूपंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज दुपारी 3 वाजून 49 मिनिटांनी हे धक्के बसले. भूपंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी होती अशी माहिती राष्ट्रीय भूपंप विज्ञान पेंद्राने एक्सवरून दिली आहे. भूपंपामुळे जिल्ह्यात घबराट पसरली. लोक घाबरून घराबाहेर पळाले. दरम्यान, या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भूपंपाचे धक्के बसल्यानंतर सर्वत्र घबराट पसरली. कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयाबाहेर धावले. अनेकजण घराबाहेर धावले. मात्र, हा भूपंपाचा धक्का सौम्य होता. त्यामुळे जीवितहानी टळली.