
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सुपेकर यांची पोलीस महानिरीक्षकपदावरून उचलबांगडी करत आता उपमहासमादेशक होमगार्ड पदावर बदली करण्यात आली आहे. सुपेकर यांचा अतिरिक्त पदभार कालच काढून घेण्यात आला होता.
जालिंदर सुपेकर हे शशांक हगवणेचे मामा आहेत. हगवणे बंधूंना नियमबाह्य शस्त्र परवाना दिल्याचा आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावर होता. शिवाय हगवणे बंधूंच्या शस्त्रपरवान्यावर सुपेकर यांची सही असल्याचे उघडकीस आल्यानंतर गृहविभागाने त्यांच्यावर कारवाई केली. गृहविभागाने त्यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कारभार काढून घेतला.