
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या पुढाकाराने मराठवाड्यातील हजारो पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. मराठवाड्यातील धाराशीव जिह्यातील भूम, परांडा व कळंब या तालुक्यांमधील पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरूपात मदत करण्यात आली.
शिवसेनेने केलेल्या मदतीमुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमात 2500 कीट पाठविण्यात आल्या. या प्रत्येक कीटमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, साखर, चहा पावडर, तूरडाळ, चणाडाळ, साबण, टूथपेस्ट व ब्रश किट, बिस्कीट, दूध पावडर व इतर सुके खाद्यपदार्थ अशा जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. या मदतीच्या उपक्रमामध्ये युवासेना कार्यकारिणी सदस्य योगेश निमसे, सिद्धेश धाऊसकर, अश्विनी पवार, युवासेना सहसचिव – भूषण शिरसाठ, अभय चव्हाण, युवासेना विस्तारक जश्विन घरत, नीलेश गवळी, मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी, युवासेना विभाग युवा अधिकारी अभिषेक मोरे, घाटकोपर पश्चिम विधानसभा पदाधिकारी, महेश मोहित व बोरिवली विधानसभा पदाधिकारी, पियूष सपकार, मालाड पश्चिम विधानसभा पदाधिकारी, रोहित चिकणे व मुलुंड विधानसभा पदाधिकारी, स्वप्नील शिवेकर व वर्सोवा विधानसभा पदाधिकारी, मयूर शेटे व कलिना विधानसभा पदाधिकारी संकेत सावंत, वरळी विधानसभा पदाधिकारी आदित्य घाटगे, मानसी गोडांबे व जोगेश्वरी पूर्व विधानसभा पदाधिकारी, हृतिक मांजरेकर, अंधेरी पश्चिम विधानसभा पदाधिकारी, सनी शिंदे व धारावी विधानसभा पदाधिकारी, दीपेश चव्हाण व चेंबूर विधानसभा पदाधिकारी, आदित्य गिड्डे व कुर्ला विधानसभा पदाधिकारी, स्वप्नील सूर्यवंशी व माहीम विधानसभा पदाधिकारी, मागाठाणे विधानसभा पदाधिकारी या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.