दाक्षिणात्य खलनायक श्रीनिवास काळाच्या पडद्याआड

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या पहाडी आवाजाने भयंकर खलनायक जिवंत करणारे तसेच विविध अंगी भूमिका गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे निधन झाले. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबाद येथील राहत्या घरी वयाच्या 83 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून कोटा श्रीनिवास यांना श्रद्धांजली वाहिली.