ट्रेंड – दारूची पॉवर!

एका दारू प्यायलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या मद्यपी व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास थेट वाघाला दारू पाजण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही व्यक्ती दारूच्या नशेत होती. त्याला वाटले की, ही मोठी मांजर आहे. त्यामुळे तो वाघाला गोंजारत असून दारू पाजण्याचा प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे या व्हिडीओत वाघ या व्यक्तीच्या समोर शांत उभा आहे. हा मद्यपी वाघाला दारूची ऑफर करतो त्यावेळी वाघ आपली मान फिरवतो. दारू प्यायल्यानंतर मद्यपी व्यक्तीचे वाढलेले धाडस आणि वाघाची शांतता पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावरून शेअर केला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील असून यावर अनेक नेटिजन्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. देशीदारूपुढे सगळं काही फेल आहे. वाघ काहीच कसं करत नाही, असेही काहींनी आपल्या कमेंटमध्ये म्हटले आहे.