विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून येणार – संजय कदम

दापोली विधानसभा मतदार संघाला लागलेला गद्दारीचा कलंक येथील जनता जनार्दनाला अजिबात रूचलेला नाही. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा अधिकच्या मताधिक्याने दिसून आले. त्यामुळे आपण गद्दारीच्या अवलादीला गाडून विधानसभा निवडणुकित मोठया मताधिक्याच्या फरकाने निवडून येवू अशाप्रकारचा विश्वास संजय कदम यांनी दापोली येथे बोलताना व्यक्त केला.

सोमवारी 10 जून 2024 रोजी दापोली शहरातील पेन्शनर्स हॉल येथे दापोली तालूका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांचा सत्कार आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा प्रमुख संजय कदम हे चांगलेच कडाडले. शिवसैनिकांना संबोधित करताना ते म्हणाले, दापोली विधानसभा मतदार संघाला लागलेली गद्दारीची किड आपल्याला ठेचून काढायची आहे. लोकसभा निवडणुकीत आपण दापोली मंडणगड आणि खेड तालूक्यातून आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगलेच मताधिक्य दिले आहे. आपल्याला एवढयापुरतेच सीमित राहवयाचे नाही अथवा थांबवयाचे नाही. आज देशाला आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचाराची गरज आहे. तेच या देशाचे पर्यायाने राज्याचे भवितव्य घडवू शकतील याचा तमाम जनतेला विश्वास आहे हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी दापोली धिानसभा मतदार संघातून शिवसेनेचा अर्थातच महाविकास आघाडीचा शिलेदार हा विधानसभेत निवडून गेला पाहीजे यासाठी निवडणुका कधीही होवोत तुम्ही सज्ज असले पाहीजे अशाप्रकारचे आवाहन करत दापोली मतदार संघाला लालेला गद्दारीचा कलंक पुसून येथे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार हे ठणकावून सांगितले.

यावेळी उप जिल्हाप्रमुख विजय जाधव, दापोली तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, उप तालुकाप्रमुख प्रकाश मयेकर, महीला आघाडी उप जिल्हा संघटिका मानसी विचारे, नगराध्यक्ष ममता मोरे, वर्षा शिर्के, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत बैकर, उसगाव विभाग प्रमुख रमेश बहीरमकर, जालगाव विभाग प्रमुख शैलेश पांगत, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, कार्यालय प्रमुख शंकर साळवी, वामन खडपकर, रविंद्र घडवले, अनंत पाटील, यशवंत बटावले,अजय शिरवणेकर, अनिल जाधव, अशोक जाधव, रविंद्र फुटे, निलेश तांबे आदी पदाधिका-यांसह शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकारी तसेच विविध ठिकाणच्या गावातील ग्रामस्थ मोठ्याा संख्येने उपस्थितीत होते.