राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱया त्या पहिल्या मराठी महिला आहेत.
संवैधानिक दर्जा असणाऱया राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दय़ांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी पेंद्र आणि राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांच्या समस्यांची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असून रहाटकर यांना पेंद्रीय राज्यमंत्रीपदाचा दर्जा असेल.