विक्रोळीमध्ये Eastern Express Highway वर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारच्या मध्यरात्री साडे बाराच्या दरम्यान विक्रोळी पुर्व द्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेलच्या समोर अपघात घडला. चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटल्यामुळे गाडी फुटफाथवर असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली. गाडीचा वेग प्रचंड असल्यामुळे गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत चालक सिद्धार्थ ढगे आणि त्याचा मित्र रोहित निकम हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.