Mumbai Accident – विक्रोळीच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, 6 जण जखमी

मुंबईतील अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी सकाळी विक्रोळी परिसरात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू केला आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळीतील गोदरेज कंपनीच्या परिसरात ही दुर्घटना घडली. एक इनोव्हा कार प्रचंड वेगात जात असताना चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. या गाडीचा वेग प्रंचड असल्यामुळे ती काही अंतरापर्यंत फरफटत जाऊन सर्व्हिस रोडलगतच्या दुभाजकावर आदळली. या अपघातात 6 जण जखनी झाले. हा अपघात होताच स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी येऊन बचावकार्य सुरू केले.