बिहारचे पोलीस अधिकारी क्वारंटाइनमुक्त! पालिकेचा निर्णय

401

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आल्यानंतर क्वारंटाइन  करण्यात आलेल्या बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला पालिकेने शुक्रवारी क्वारंटाइनमुक्त केले आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून पाटण्याचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारमधून पाटण्याचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी हे मुंबईत आले होते. मात्र पालिकेने केंद्र-राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तिवारी यांना क्वारंटाइन केले होते. क्वारंटाइनमधून सूट हवी असल्यास आधी रीतसर अर्ज करावा लागतो असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र पालिकेच्या या निर्णयावर उलटसुलट चर्चा-टीका सुरू झाली होती. दरम्यान, सुशांत सिंह रजपूत प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आल्याने बिहारचे शहर पोलीस अधिक्षक विनय तिकारी यांची क्वारंटाइनमधून शुक्रवारी सुटका करण्यात आली. मात्र मुंबईतून बिहारला जाण्यासाठी त्यांना 8 ऑगस्टपर्यंतची मदत महापालिका प्रशासनाने दिली आहे. बिहारमधून आलेले अन्य चार चौकशी अधिकारी यापूवीच परतले आहेत. दरम्यान, तिवारी हे क्वारंटाइनमुक्त झाल्यानंतर तातडीने बिहारकडे रवाना झाल्याचे समजते.

पालिका म्हणते…

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची आता सीबीआयकडून चौकशी होणार असल्याने तिवारी यांना बिहारला परतण्याची परवानगी द्याकी, अशी विनंती करण्यात आली होती. यानुसार किनय तिवारी यांना शुक्रकारी क्वारंटाइनमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र नियमावलीनुसार, एखाद्या अत्यावश्यक कामासाठी आलेल्या व्यक्तीला सात दिवसांत मुळगावी जाता येते. अन्यथा त्या व्यक्तीस चाचणी करणे तसेच पुढील सात दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. त्यामुळे तिवारी यांना 8 ऑगस्टपर्यंत मुंबई सोडावी लागेल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांनी बिहार पोलिसांना पत्राद्वारे कळवले.

आपली प्रतिक्रिया द्या