हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटला Paris Olympics 2024 मध्ये अपात्र ठरवल्यामुळे विनेश फोगाटसहित हिंदुस्थानी नागरिकांचा सुवर्णभंग झाला आहे. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आपले मत मांडत विनेश फोगटला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तू आमच्यासाठी गोल्ड मेडल असल्याचे त्याने गौरवोद्गार काढले आहेत.
फायनलमध्ये धडक मारून इतिहास रचणाऱ्या विनेश फोगाटला आज सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. तसेच विनेश सुवर्णपदक जिंकणार हा विश्वास हिंदुस्थानातील सर्व नागरिकांना होता. मात्र विनेशचे वजन 100 ग्रॅमने वाढल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. यावरून हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने ट्वीट (X) करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “विनेशला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले, हे हृदयद्रावक आहे. विनेश तु आमचा अभिमान आहेस. तुझी मान उंच ठेव. कारण तूच आमच्यासाठी गोल्ड मेडल आहेस.” असं म्हणत हरभजन सिंगने संपूर्ण हिंदुस्थान तुझ्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे.
Heartbreaking 💔💔💔💔💔 to know that Vinesh is Disqualified for the Final match . @Phogat_Vinesh You are our pride. Keep ur chin up .. you are our Gold Medal 🙌🙌🙌🙌🙌 pic.twitter.com/Qd6NnZiFWe
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) August 7, 2024