Vinesh Phogat: विनेश कायमच सर्वांचे प्रेरणास्थान राहिल; सेलिब्रीटींनी व्यक्त केल्या भावना

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचलेली हिंदुस्थानी कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक जिंकण्यापासून काही काळ दूर असतानाच सर्वांच्या आनंदाला ग्रहण लागले. विनेशचे अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन अधिक असल्याने स्पर्धेत अपात्र ठरविण्यात आले. या बातमीने विनेश सोबतच अनेक देशवासियांचे मन दुखावले गेले. आता सेलिब्रिटींनीदेखील त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

विनेशने मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी 50 किलो वजनी गटातील फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सेमीफायनल क्युबाची युस्नेलिस गुझमान हिचा 5-0 अशा फरकाने परभाव केला. यानंतर सगळ्यांचे लक्ष सुवर्णपदकाकडे लागले होते. मात्र काही क्षणात आनंदावर विरझन पडले. यावरून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोनाक्षीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये “विश्वास बसत नाही” मी कल्पना ही करू शकत नाही की आता तुला कसे वाटत असेल, पण कालही आजही आणि नेहमीच तु चॅम्पियन राहशील, असे लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री स्वरा भास्करने सुद्धा विनेश फोगाट प्रकरणावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वराच्या म्हणण्यानुसार विनेश विरोधात कट रचन्यात आला आहे. स्वराने “X” वर 100 ग्रॅम वजन या गोष्टीवर कुणाचा विश्वास बसला? असा संशय व्यक्त करणारा प्रश्न विचारत आपले मत मांडले आहे.

सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी देखील “X” वर विनेशचा फोटो शेअर करत काही ग्रॅम सुद्धा आयुष्यात मोठे बदल घडवू शकते. विनेश फोगाटची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.

 तेच अभिनेता फरहान अख्तर याने विनेश फोगाटला पाठिंबा दर्शवला आहे. कुस्तीपटू फोगाटचे मनोबल वाढविण्यासाठी संपूर्ण देशवासियांना तुझा खूप अभिमान आहे. तु नेहमीच लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेस आणि राहशील, असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)