ट्रेंड – मैना आणि तरुणाच्या मैत्रीने जिंकले मन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पशुपक्ष्यांचे अनेकदा माणसासोबत घट्ट नाते निर्माण होते. या प्राण्यांचा एकदा तुमच्यावर विश्वास जडला की ते तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील एक भाग बनवतात. हे नाते दर्शवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण नारळ फोडतो. त्याच्या अवतीभवती एक मैना फिरताना दिसते. तिला प्रतीक्षा असते, हा तरुण आपल्याला नारळाचे पाणी कधी पाजतो. हा तरुण अतिशय काळजीपूर्वक नारळ फोडतो आणि त्यातील पाणी एका पेल्यात गोळा करतो. त्यानंतर थोडे नारळपाणी एका झाकणात घेऊन ते ड्रॉपरच्या मदतीने मैनेला पाजतो. नारळ पाणी पिऊन तृप्त झालेली मैना नंतर थोडे ओले खोबरेदेखील त्याच्या हातून खाते. या दोघांची मैत्री पाहून नेटकऱ्यांनी दोघांमधील विश्वासाचे खूप कौतुक केले आहे.