
इन्स्टाग्रामवरचा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर किली पॉल हा अनेकदा हिंदुस्थानी गाण्यावर डान्स करतानाचे रिल्स पोस्ट करत असतो. त्याच्या भन्नाट डान्सवर हिंदुस्थानातील चाहतेदेखील फिदा आहेत. यावेळी त्याने ‘कमरिया हिला रही है’ या भोजपुरी गाण्यावर रील पोस्ट केली आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धूम केलेली आहे. अनेक जणांनी यावर रिल्स बनवल्या आहेत. या गाण्यावर रिल बनवण्यापासून किली पॉलदेखील स्वतःला रोखू शकला नाही. किली पॉल हा त्यात त्याच्या पारंपरिक वेशात दिसतो. गाण्याच्या तालावर किली पॉलने भन्नाट ठेका धरला. त्याच्या चेहऱयावरील हावभाव आणि पदलालित्य सर्वांचे लक्ष वेधून घेते. त्याने लावलेले ठुमके पाहून चाहत्यांनी त्याच्या पोस्टला हजारो लाईक्सची भेट दिली आहे. त्याच्या या रिलवर 10 लाखांपेक्षा जास्त ह्यूज मिळाले आहेत.

























































