
इन्स्टाग्रामवर सध्या ‘विंचू चावला’ या मराठी गाण्यावरील भन्नाट डान्स वायरल झाला आहे. इन्स्टाग्राम युजर मयुरेश व निकिता या दोघांनी केलेल्या तुफान डान्सने नेटकऱयांचे लक्ष वेधले आहे. मयुरेश हा स्वतः डान्सर आहे. निकिता ही आई असून हिने लाल साडी नेसून इतका सुंदर डान्स करत मयुरेशला तोडीची टक्कर दिली आहे. दोघांचे टायमिंग, त्यांचे हावभाव, स्टेप पाहून नेटकऱयांनी त्यांच्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. mayuresh_bagal आणि nikita2990 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या ’विंचू चावला’ या गाण्यावरील डान्सला मिलियनमध्ये व्हय़ुज गेले आहेत.





























































