ट्रेंड – रखरखत्या उन्हात निःस्वार्थी सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली 21 वर्षे निःस्वार्थपणे प्रवाशांची तहान भागवणाऱ्या वृद्ध व्यक्तीच्या सेवाभावाने हजारो नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. 77 वर्षीय थाना राम कडवासरा गेल्या 21 वर्षांपासून राजस्थानच्या बारमेरमधील एका गजबजलेल्या रस्त्यावरून वाळवंटातून प्रवास करणाऱया प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचे काम करतात. दररोज बाडमेर-बटाडू मार्गावर ठाणा राम हे बसमधील प्रवासी, टॅक्सी चालक आणि वाटसरूंसाठी थंड पिण्याच्या पाण्याने बाटल्या काळजीपूर्वक भरताना दिसतात. त्यांची ही साधी, पण मोलाची कृती प्रवाशांसाठी मोठा आधार ठरते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @desertslife या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ठाणा राम यांच्या निःस्वार्थ कृतीचे नेटिजन्स कौतुक करत आहेत.