मुंबईतील एका महिलेचा साफसफाई करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडिवर प्रचंड व्हायरल होत आहे. कारण ही महिला आपला जीव धोक्यात घालून इमारतीच्या 16 व्या मजल्यावरील घराच्या खिडकीबाहेर उभी राहून खिडक्या पुसत आहे. यावेळी तिने सुरक्षेची कोणतीही दक्षता घेतलेली नाही. अशा वेळी थोडासा निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडीओ असून त्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
ही धक्कादायक घटना मुंबईतील कांजुरमार्ग भागातील रुणवाल बिल्डींगमधील आहे. येथे महिला 16 व्या मजल्यावरील घराच्या खिडक्याबाहेर उभी राहून साफ करत होती. यावेळी त्या महिलेने कशाचाही आधार घेतला नव्हता. ती बिनधास्तपणे खिडकीच्या बाहेर उभी राहून काम करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं पसरत आहे.
काहीही हं…! घर चकाचक करण्यासाठी 16 व्या मजल्यावर खिडकी बाहेर उभी राहून साफसफाई, नेटकरी संतापले#Mumbai #Kanjurmarg #Viralvideo pic.twitter.com/s3mR20zCO0
— Saamana (@SaamanaOnline) August 12, 2024
नेटकऱ्यांनी या धक्कादायक व्हिडीओवर चांगल्याच आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी तिच्यावर तसे करण्यासाठी दबाव टाकला असवा असा संशय व्यक्त केला आहे. तर काहींनी मीम्स शेअर करत ही स्टंटमॅनची मुलगी आहे का असा सवाल केला. एका यूजरने कमेंट केली की, ‘आम्ही कोट्यवधींचा फ्लॅट घेऊनही अमूल्य असलेल्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालू’ असा सणसणीत टोलाही लगावला आहे. तर काही जणांनी ती महिला मोलकरीण असल्याची शक्यता व्यक्त करून मोलकरणींना अशा पद्धतीने वागवणाऱ्या घरमालकांवर कारवाईची करण्याची मागणी केली आहे.