“एक छोटा ब्रेक घेतोय, लवकरच…”, नुकताच बाप झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा सोशल मीडियाला रामराम, नेमकं कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता, निर्माता आणि नुकताच बाबा झालेल्या विष्णू विशाल याने सोशल मीडियापासून काळी काळ लांब राहणअयाचा निर्णय घेतला आहे. ‘वेनिला कबाडी कुझू’, ‘कुल्लनारी कूट्टम’ आणि ब्लॉकबस्टर ‘रातसासन’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विष्णूने शुक्रवारी आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती दिली आहे.

सोशल मीडियावरून एक छोटा ब्रेक घेत आहे… लवकरच आगामी चित्रपटांच्या अपडेट्ससह परत येईन, असे विष्णू म्हणाला. यासोबत त्याने #IranduVaanam #GattaKusthi2 ही आगामी चित्रपटांची नावेही त्याने हॅशटॅग म्हणून वापरली आहेत. अर्थात हा छोटा ब्रेक घेण्यामागील कारण त्याने स्पष्ट केलेले नाही.

मात्र सोशल मीडियावरून ब्रेक घेतानाच त्याने चाहत्यांना सुखद धक्काही दिला आहे. तो लवकरच ‘इरंडू वानम’ या रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे. तसेच, 2022 मध्ये गाजलेल्या ‘गट्टा कुस्ती’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘गट्टा कुस्ती 2’ मधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विष्णू विशालचा ‘आर्यन’ हा चित्रपट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित झाला. प्रवीण के. दिग्दर्शित आणि विष्णू विशाल स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सेलवाराघवन आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट एका एका मास्टरमाइंड सिरियल किलरला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या निष्ठावान पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरतो. चाहत्यांनी या चित्रपटाला भरभरून प्रेमही दिले होते.

मावशीकडून लैंगिक शोषण, शाळेत शिक्षिकेचं चुंबन; दारू पिऊन महिलांना अश्लील कॉल अन् …; अभिनेत्याचे धक्कादायक खुलासे

पहिला मुलगा, दुसरी मुलगी

दरम्यान, विष्णू विशाल याने 2021 मध्ये बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिच्याशी लग्न केले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी हे दांपत्य दुसऱ्यांदा आई-बाबा झाले होते. ज्वाला गुट्टा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. याचा फोटोही विष्णूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishnu Vishal (@thevishnuvishal)