टाटा पॉवरच्या ग्राहकांसाठी व्होल्टासचा एसी अर्ध्या किमतीत मिळणार

924

टाटा पॉवरच्या मुंबईतील वीज ग्राहकांना खूशखबर आहे. त्यांनी व्होल्टास कंपनीचा स्प्लिट एसी खरेदी केल्यास 50 टक्के एवढी घसघशीत सूट देण्याचा निर्णय टाटा पॉवर आणि व्होल्टास कंपनीने घेतला आहे. 31 डिसेंबरपर्यंत टाटाच्या वीज ग्राहकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.  वीज बचतीसाठी टाटा पॉवरकडून वीज ग्राहकांना वीज बचत करणारी फाइव्ह स्टार रेटिंग असलेली विद्युत उपकरणे उपलब्ध करून दिली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ग्राहकांना व्होल्टास कंपनीच्या इन्व्हर्टर एसी खरेदीवर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी एक वर्षाची वॉरंटी असणार आहे. सवलतीच्या दरात एक, दीड आणि दोन टनाच्या एसीचा समावेश असणार आहे. दरम्यान, एका घरगुती वीज ग्राहकाला एक तर व्यावसायिक ग्राहकाला दोन एसी सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. त्याबाबत टाटा पॉवर आणि व्होल्टास यांच्यात करार झाला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या