वाई तालुक्यातील प्रमुख गावांतील जागा आरक्षित

तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुन्हा एकदा काढण्यात आली. तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये जागा आरक्षित झाल्यामुळे पुढाऱयांची डोकेदुखी वाढली आहे. तर, गावपुढाऱयांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. ओबीसी सरपंचपदाची एक जागा वाढली आहे, तर सर्वसाधारण एक जागा कमी झाली आहे.

किसन वीर सभागृहात तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली, तर नाईब तहसीलदार वैभव पवार, भाऊसाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. चिठ्ठय़ा काढून काही गावांतील आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षणामुळे अनेकांचे स्वप्न भंगले असून, ज्या ठिकाणी मागील वेळेस ओबीसी आरक्षण पडले होते, तेथे सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने ‘कहीं खुशी कहीं गम’, अशी अवस्था झाली आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीवसाठी पसरणी, केंजळ, अनवडी, मोहोडेकरवाडी, मांढरदेव, धोम, खोलवडी, कोंढवळे, गुंडेवाडी (पिराचीवाडी), वडोली, दसवडी, परतवाडी, गाढवेवाडी, दरेवाडी, ओबीसी खुल्या गटासाठी बावधन, सुरूर, खावली, उडतारे, व्याजवाडी, भिवडी पुन. वेलंग, कोंढवली, ओहोळी, अनपटवाडी, मुगांव (न्हाळेवाडी), कुसगांव, वेरुळी(डुईचीवाडी) आरक्षित झाले आहे. तसेच अनुसूचित जाती महिला कणूर, गुळुंब, जांब, लगडवाडी (मापरवाडी, वाकनवाडी), वाशिवली, तर खुल्या गटामध्ये उळुंब (बलकवडी), एकसर, चांदवडी, जांभळी, परखंदी.