मधुमेह आणि लठ्ठपणा टाळायचा आहे ?… चहा ऐवजी हे पेय घ्या

692

सामना ऑनलाईन । लंडन

दिवसेंदिवस मधुमेहाचे आणि लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. काहीवेळा अनेक उपाय करुनही मधुमेह नियंत्रणात येत नाही. आता मधुमेह आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी कॉफीचे सेवन करा आसा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. प्रत्येकास चहा घेऊन दिवसाची सुरुवात करण्याची सवय असते तर काही लोकांना ‘बेड टी’ घेण्याची सवय असते, परतुं चहा ऐवजी कॉफी प्यायल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते, असे अभ्यासातून समोर आले आहे.

कॉफीवरील अभ्यासात शरीरातील चरबीचा शोध घेण्यासाठी थर्मल इमेजिंग तंत्राचा वापर करण्यात आला आहे. कॉफीचा चरबीवर थेट परीणाम होतो त्यामुळे कॅलेरीज लवकर कमी होतात. चरबी ही प्रामुख्याने मानेच्या भागात आढळते त्यामुळे गरम कॉफी प्यायल्याने त्यात घट होण्यास मदत होते, असे नॉटिंघम विद्यापीठाचे प्राध्यापक मायकल सायमंड्स म्हणतात. प्रमाणात कॉफी सेवन केल्यास शरीरात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. कॉफीमधील कॅफेन हा घटक उत्तेजक म्हणून काम करतो. तसेच कॉफीतील इतर घटक मधुमेह आणि लठ्ठपणा नियंत्रित करण्याचे काम करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या