पिक्चर अभी बाकी है, निवडणूक आयोगाप्रकरणी राहुल गांधी यांचे सूचक विधान

एक व्यक्ती एक मत हा संविधानाचे पाया आहे, असे विधान काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच पिक्चर अभी बाकी है असे सूचक विधानही त्यांनी केले.

संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आणखी काही दिवस थांबा, फक्त एकच नव्हे तर अशा अनेक जागा आहेत त्यावर असा घोटाळा झाला आहे. मोठ्या प्रमाणात पद्धतीशरपणे मतांची चोरी करण्याचे काम सुरू आहे. पूर्वी आमच्याकडे पुरावे नव्हते आता आमच्याकडे पुरावे आहेत. आणि आम्ही संविधानाचे रक्षण करु इच्छितो. एक व्यक्ती एक मत हा संविधानाचे पाया आहे. आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की देशात एक व्यक्ती एक मत याची अंमलबजावणी व्हावी. आणि ही जबाबादारी निवडणूक आयोगाने पार पाडलेली नाही. आम्ही फक्त संविधानाचे रक्षण करत आहोत आणि करत राहणार. असे काही मतदार समोर आले आहेत त्यांचे वय 124 आहे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. पिक्चर अभी बाकी है असेही राहुल गांधी म्हणाले.