कांदळवनाची हत्या आणि जमीन घशात घालण्याच षडयंत्र आम्ही पूर्ण होऊ देणार नाही – अनिल परब

अंधेरीत मधल्या कांदळवन नष्ट करून ती जमीन खासगी संस्थेच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या कांदळवनाला भेट दिली आणि हे षडयंत्र पूर्ण होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.

अनिल परब म्हणाले की, विधानसभेच्या पावसाळी सत्रामध्ये मुंबईमध्ये 350 एकर जमीन ही गिळली जाते किंबहुना मुंबईतलं तांदळवन नष्ट केलं जात आहे. या संदर्भातला मुद्दा मी विधान परिषदेत मांडला होता. त्यावेळेला विधान परिषदेत मी नकाशा सकट वस्तुस्थिती दाखवली होती की पूर्वी इथे किती कांदळवन होते. कशा पद्धतीने ते मारले गेले? कशा पद्धतीने नैसर्गिक भिंत मातीची तयार करून कांदळवनाला येणारं पाणी अडवलं गेलं आणि कांदळवनाची हत्या झाली. हे सगळे सविस्तर मुद्दे मांडल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेनी मला विधान परिषदेत उत्तर दिलं की मी स्वतः येऊन जागेची पाहणी करते आणि त्याच्यानंतर कारवाई करते. 19 जुलैला पर्यावरण मंत्री पंकजाताई त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांसकट मी स्वतः या वर्सोवा विधानसभेचे आमदार हारुन खान यांनी सगळी पाहणी करून त्यांना ही सगळी वस्तुस्थिती मी दाखवली. तेव्हा हा रस्ता किंवा ही जी भिंत आहे ही ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश देते असं मला सांगितलं. परंतु झालं उलटंच. पंकजाताई येऊन गेल्यानंतर आणखीन जोमाने काम चालू झालं. भरणीच मोठ्या पद्धतीने सुरू झालं. जवळजवळ दिवसाला इथे दोन एक हजार ट्रक आज भरणी करतायत. त्यांना कोणी अडवत नाहीये आणि कोणी त्याची परमिशन विचारत नाहीये. काही ठिकाणी जरा दोन वाळूची घमेल पडली तरी पोलीस जातात असे अनिल परब म्हणाले.
तसेच स्थानिकांच्या तक्रारीवरून मी पुन्हा एकदा बघायला आलो. यात किती जणांचे हात ओले झालेले आहेत हे माहित नाही. परंतु चित्रात असं दिसतय की सगळ्यांच्या सहकार्याने हे कांदळवनाची हत्या होईल आणि ही जागा कुठल्यातरी बिल्डरच्या घशात जाईल. 35 एकर जमीन जी महाराष्ट्र शासनाने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिलेली आहे, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. कारण ती शासनाने दिलेली जागा आहे. त्याचबरोबर हा पूर्ण नो डेव्हलपमेंट झोन आहे. या झोनमध्ये आणखीन 35 एकर जमीन उषा मधू डेव्हलपर्सला मिळालेली आहे. म्हणजे 70 एकर जमीन आता डीनोटिफाईड झालेली आहे. याच्या मागचा उद्देश असा दिसतोय की कांदळवण पूर्ण मारून टाकायचा आणि एकदा कांदळवण मेला की ती जमीन नॉन डेव्हलपमेंट मध्ये येते. म्हणजे थोडक्यात ही 300 साडेतीनश एकर जी जमीन आहे त्याला पूर्ण चारही बाजूने अशी मातीची भिंत बांधली गेली. इथे सगळा चोरीचा बनाव सुरू असून जागा ढापण्याचे काम सुरू आहे. सगळ्या यंत्रणा कदाचित खिशात टाकल्या असतील असं दिसतंय. परंतु शिवसेना म्हणून आणि विभागातले जागरूक नागरिक याला प्रचंड विरोध करू. अशा प्रकारची कांदळवनाची हत्या आणि जमीन गडप करण्याचे किंवा घशात घालण्याच षडयंत्र आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असेही अनिल परब म्हणाले.