ट्रेंड- हळद लागली… हळद गाजली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हल्लीच्या लग्नांमध्ये मुख्य सोहळ्यापेक्षा हळद, रिसेप्शन, प्री-वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट अशा साइड इव्हेंटचीच जास्त चलती असते. त्यातही हळदी समारंभ सर्वात हिट. खाणे, पिणे आणि नाचगाणे असे सगळेच यात येते. ज्याला जे जमेल, त्याने ते करावे असा हा मामला असतो. फुल्ल टू धम्माल… साहजिकच या सोहळ्यांचे धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतात. अलीकडे असाच एक हळदीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुणी मराठी लावणीवर धम्माल डान्स करताना दिसतेय. मला पिरतीच्या झुल्यात झुलवा… ही ती सदाबहार लावणी आहे. तिचा हा डान्स सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.