स्कूल बस चालकांची आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस चालकांची दर आठवडय़ाला मद्यपान आणि औषध चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय विभागाने जारी केलेला नियम राज्यातील सर्व शाळांना लागू करण्यात आला असून शिक्षण विभागाने याबाबत निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार आणि सेविकांची सकाळी-सायंकाळी अशी दोन वेळेस चाचणी करण्यात येईल.