
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रसंगावधान ठेवा
मेषेच्या व्ययेशात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, वाद होतील. प्रसंगावधान ठेवा. अहंकार दूर ठेवा. नोकरीत कामात लक्ष द्या. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. शुभ दि. 8, 9
वृषभ – वरिष्ठांची मर्जी राखा
वृषभेच्या एकादशात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. मनावर दडपण येईल. कुणालाही नाराज करू नका. मोह टाळा. नोकरीत वरिष्ठांजी मर्जी राखा. खंबीर धोरण महत्त्वाचे ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील. शुभ दि. 6, 7
मिथुन – तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल
मिथुनेच्या दशमेशात बुध, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल. क्षुल्लक अडचणींना जास्त महत्त्व देऊ नका. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. नवे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मैत्री वाढेल. शुभ दि. 5, 8
कर्क -कुणालाही कमी लेखू नका
कर्केच्या भाग्येषात बुध, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. कुणालाही कमी लेखू नका. कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. नोकरी कठीण कामे कराल. नविन परिचय उत्साहवर्धक. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकार्य मिळवाल. शुभ दि. 6, 7
सिंह – तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल
सिंहेच्या अष्टमेशात बुध, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल. क्षुल्लक अडचणींना जास्त महत्त्व देऊ नका. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. स्वतची काळजी घ्या. शुभ दि. 5, 8
कन्या – चौफेर यश मिळेल
कन्येच्या सप्तमेशात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. तुमच्या कार्याला चेफेर यश मिळेल. नोकरीधंद्यात लाभ होईल. कर्जाचे काम करा. कला, क्रिडा, साहित्यात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण कामे करून घ्या. शुभ दि. 6, 11
तूळ – अहंकारयुक्त भाषा नको
तुळेच्या षष्ठेशात बुध, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. उत्साह, आत्मविश्वास वाढेल तरीही अहंकारयुक्त भाषा नको. कायदा पाळा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. धंद्यात हिशेब तपासा. कठीण कामे संयमाने करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य वागणूक ठेवा. शुभ दि. 6, 8
वृश्चिक – अनाठायी खर्च होईल
वृश्चिकेच्या पंचमेशात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नात्यात गैरसमज होतील. अनाठायी खर्च होईल. नोकरीत कठीण कामे कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारांना चालना मिळेल. शुभ दि. 8, 9
धनु – कामाचे कौतुक होईल
धनुच्या चतुर्थेशात बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. कर्तव्य पूर्ण करा. व्यसन, मोह नको. कठीण कामे पूर्ण करा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात जम बसवा. नवे काम मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टिकोन ठेवा. कायदा पाळा. शुभ दि. 10, 11
मकर – तज्ञांचा सल्ला घ्या
मकरेच्या पराक्रमात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो मोठा निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्या. विरोधक मैत्री करण्यास येतील. कामात तत्परता दाखवा. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 5, 6
कुंभ – प्रत्येक दिवस महत्त्वाचा
कुंभेच्या धनेषात बुध, चंद्र त्रिकोण्योग. प्रत्येक दिवस महत्वाचा, यश देणारा ठरेल. तणाव दूर करा. नोकरीधंद्यात वाढ होईल. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनसंपर्क वाढेल. नविन मैत्री होईल. शुभ दि. 5, 7
मीन – नोकरीत वर्चस्व राहील
स्वराशीत बुध, मंगळ हर्षल लाभयोग. साडेसाती सुरू आहे. समतोल राखल्यास कोणत्याही प्रसंगाला हुशारीने सामोरे जाता येईल. धंद्यात मधुरवाणी ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. शुभ दि. 8, 9


























































